मराठी दिन
मराठी दिन
सिल्वर क्रेस्ट कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांच्या जन्मदिवस हा आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो याचे औचित्य साधून सिल्वर क्रस्ट ज्युनिअर कॉलेज येथे कनिष्ठ महाविद्यालया मराठी दिन उत्साहात साजरा केला गेला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. मराठी भाषा जतन, संवर्धन ,वापरआणि आवश्यकता अशा विविध बाजूंनी तेजस एनापुरे व आर्या निंबाळकर या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले . सानिका नंदनिकर या विद्यार्थिनीने मराठीतील गाणे सादर केले.तसेच अंचित येनपुरे, सर्वेश कदम, साईराज घडशी, श्रीप्रसाद घोणे, रितेश बोरगे या मुलांनी मराठी भाषेतील पोवाडा व कविता सादर केल्यात.
याचवेळी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतील एका
शब्दावरून पुढील म्हणी ओळखा. म्हणींचे अर्थ सांगा अशा प्रकारे विविध खेळाचे आयोजन केले होते.