मराठी भाषा गौरव दिन
झील एज्युकेशन सोसायटीचे सिल्वर क्रेस्ट ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मराठी भाषेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रभावी मराठी भाषण सादर करून आपल्या विचारांची प्रभावी मांडणी केली.
- कविता सादरीकरण
- मराठी चारोळी सादरीकरण
- म्हणी स्पर्धा
- गोष्टीचे सादरीकरण
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मराठी भाषा ही आपली ओळख, संस्कृती आणि अभिमान आहे. चला, आपल्या मातृभाषेचा सन्मान राखूया आणि तिचा गौरव वाढवूया!